पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असणाऱ्या महिलांनी या अन्नपदार्थांचे सेवन टाळावे

PCOS
PCOS असणाऱ्या महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. मासिक पाळी अनियमित होण्यापासून ते चेहऱ्यावर नकोशा असलेल्या केसांची वाढ इथपर्यंत अनेक समस्यांना या महिलांना तोंड द्यावे लागते. जर हा विकार बळावला, तर अनेक महिलांच्या बाबतीत गर्भधारणा होणे कठीण होऊ शकते. हा विकार मुख्यत्वे महिलांच्या शरीरामध्ये हार्मोन्सचे असंतुलन निर्माण झाल्याने उद्भवितो. हार्मोन्स असंतुलित झाल्याने त्याचे दुष्परिणाम बीजकोशावर होऊन, त्यामध्ये सिस्ट निर्माण होण्यासारख्या समस्या या विकारामध्ये उद्भवितात. हा विकार जीवघेणा नसला, खरी खूप त्रासदायक ठरू शकतो. या विकाराच्या बाबतीत जीवनशैली आणि आहार हे दोन्ही पैलू अतिशय महत्वाचे ठरतात. त्यामुळे या विकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनशैलीमध्ये योग्य परिवर्तन आणि आहारामध्ये काही बदल करणे अगत्याचे ठरते.
PCOS1
PCOS असणाऱ्या महिलांनी आपल्या आहारामध्ये भरपूर ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी, मासे, आणि अनसॅच्युरेटेड फॅटस् समाविष्ट करायला
हवेत. त्याचबरोबर काही अन्नपदार्थांचे सेवन आवर्जून टाळायला हवे. PCOS असणाऱ्या महिलांनी साखरेचे अतिसेवन टाळायला हवे. त्याचबरोबर साखरेचे प्रमाण अधिक असणारे प्रोसेस्ड ज्यूस, शीतपेये, तसेच मैद्याचा वापर करून बनविलेले पदार्थ, म्हणजेच बिस्किटे, ब्रेड, पिझ्झा, आणि तत्सम पदार्थ टाळायला हवेत. त्याचप्रमाणे ज्या अन्नपदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त आहे, उदाहरणार्थ लोणची, वेफर्स, चिप्स इत्यादी पदार्थांचे सेवन टाळावे. तसेच दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही माफक प्रमाणात करावे.
PCOS2
PCOS असणाऱ्या महिलांनी सोयाबीन किंवा सोयाबीन पासून तयार केलेले पदार्थ टाळावेत. तसेच ट्रान्स फॅटस् किंवा हायड्रोजनेटेड फॅटस् असणारे पदार्थ टाळावेत. भोजन बनविण्यासाठी रिफाईन्ड तेलाचा वापर न करता फिल्टर्ड किंवा ‘कोल्ड प्रेस्ड’ (कच्ची घनी) तेलाचा उपयोग करावा. कॅफिन युक्त पेये आणि मद्यपान ही टाळायला हवे. साखरेचे सेवन टाळताना कृत्रिम स्वीटनर्स वापरू नयेत. त्या ऐवजी गूळ किंवा मधाचा उपयोग करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment