नायजेरियामध्ये आहे मुले जन्माला घालण्याचा कारखाना

baby
मुले जन्माला घालण्याचे अनेक कारखानेच आफ्रिकेच्या नायजेरिया या देशात चालवले जात असून बेबी फॉर्मिंग या गोरखधंद्याला येथे म्हटले जाते. अल्पवयीन तरुणींना येथे इतरांना मुलांचा आनंद मिळावा म्हणून बळजबरी आई बनवले जाते. येथे आफ्रिकी मुलींच्या माध्यमातून विदेशींनाही बळजबरी मुले जन्माला घालून ती विकली जातात.
baby1
दरम्यान हा गोरखधंधा एका मुल न होणाऱ्या दाम्पत्यासाठी मुल जन्माला घातल्यानंतर हा धंदा सुरु झाला. येथे मुली आणि महिला पैशांच्या लालसेपोटी आणून विकले जाते. त्यानंतर त्यांना जबरदस्ती माता होण्यास प्रवृत्त केले जाते. बेबी फार्मिंगचा धंदा फक्त नायजेरियाच नाही तर इंडोनेशियासह इतर अनेक देशांतही हॉस्पिटल आणि अनाथाश्रमांसारख्या ठिकाणी बिनधास्तपणे केला जातो. त्यासाठी कमी वयाच्या मुलींना बळजबरी तयार केले जाते. यापैकी बहुतांश मुली अनाथ किंवा गरीब असल्याने त्याही नाइलाजाने तयार होतात.
baby2
या गोरखधंद्याची परिस्थिती नायजेरियात अत्यंत बिकट बनली आहे. येथे आई बनणाऱ्या मुलींचे वय १४ ते १७ वर्षांदरम्यान असते. गर्भपातही त्यांना करता येत नाही, कारण नायजेरियात गर्भपात बेकायदेशीर ठरतो. त्याचाच फायदा उचलून माफिया म्हणजे ‘बेबी फार्मर्स’ मुलींवर दबाव आणून मुले जन्माला घालतात आणि त्यांना तीन ते चार लाखांत विकले जाते. मुले हवी असणारेही याला विरोध करत नाही, कारण मेडिकल ट्रिटमेंटऐवजी ही पद्धत अधिक स्वस्त आणि सोपी ठरते.

Leave a Comment