नार्कोलेप्सी हा आजार नेमका आहे काय?

Narcolepsy
सर्वसाधारणपणे आपल्या झोपेच्या वेळा ठरलेल्या असतात. एखाद्या कारणाने जरी झोपेचे वेळापत्रक गडबडले, तरी काही दिवसांतच ते पूर्वपदावर येत असते. पण जेव्हा झोपेचे वेळापत्रक बिघडते, झोप अपूर्ण होते, तेव्हा त्याचा होणारा त्रास आपल्याला अस्वस्थ करणारा असतो. थकवा, मानसिक तणाव, क्वचित प्रसंगी होणारी चिडचिड, अश्या प्रकारच्या अनुभवांतून आपण सर्वच गेलो आहोत. जेव्हा झोपेचे वेळापत्रक पूर्वपदावर येते, तेव्हा शरीराला मिळणारी आठ तासांची विश्रांती सर्व थकवा दूर करणारी आणि शरीरामध्ये चैतन्य निर्माण करणारी ठरते. म्हणूनच शरीराचे आरोग्य जपायचे असेल तर योग्य खानपान, आवश्यक तितका नियमित व्यायाम आणि विश्रांती, म्हणजेच झोपेच्या वेळा नियमित असण्याबद्दल आग्रह केला जातो.
Narcolepsy1
मात्र काही व्यक्तींना वेळी अवेळी झोप येत असते. सर्वसाधारण लोकांसारखी सहा ते आठ तासांची झोप या व्यक्तींना पुरत नाही. वारंवार येणाऱ्या झोपेवर या व्यक्तींचे नियंत्रण राहू शकत नाही. हा एक प्रकारचा आजार असून, याला नार्कोलेप्सी या नावाने ओळखले जाते. या व्यक्तींना आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवता येणे अशक्य असल्याने या व्यक्ती कधीही, कुठेही झोपतात. तसेच दिवसातून या व्यक्ती अनेकदा झोपी जातात. या आजारामध्ये रुग्णाला झोप अनावर होतेच , पण त्याशिवाय ज्यावेळी झोप येत असते, त्यावेळी या व्यक्तींचे वर्तनही नेहमीपेक्षा वेगळे असते.
Narcolepsy2
नार्कोलेप्सी हा एक प्रकारचा मानसिक आजार असून, हा आजार बरा होण्यासाठी दीर्घ काळ उपचार घ्यावे लागतात. पूर्ण दिवसामध्ये वारंवार झोप येणे, मन एकाग्र करणे अशक्य होणे, अचानक गाढ झोप लागणे आणि असे वारंवार होणे, अश्या प्रकारची लक्षणे आढळून येतात. या शिवाय या रुग्णांमध्ये ‘स्लीप पॅरालीसीस’ ही आढळून येतो. ही अशी अवस्था असते, जेव्हा झोपलेली व्यक्ती जागी झाल्यानंतर काही काळ बोलू शकत नाही किंवा शरीराची इतर कोणत्याही प्रकारची हालचाल करू शकत नाही. अश्या व्यक्ती झोपेमध्येही अस्वस्थ असून, त्यांना वारंवार चित्रविचित्र स्वप्ने पडत असतात.
Narcolepsy3
शरीरामध्ये हायपोक्रीटीन हार्मोन, किंवा ऑरेक्झिन हार्मोन जर कमी प्रमाणात सक्रीय असला, तर हा आजार उद्भविण्याची शक्यता असते. हा हार्मोन मेंदूला जागृतावस्थेमध्ये ठेवण्याचे काम करतो. शरीराची प्रतिरोध क्षमता जेव्हा हा हार्मोन निर्माण करणाऱ्या कोशिकांना प्रभावित करते, तेव्हा हा विकार उद्भवू शकतो. हा विकार संपूर्णपणे बरा होणारा नाही, पण औषधोपचारांनी याची तीव्रता कमी करता येते. तसेच या रुग्णांना दिवसाकाठी ठराविक काळामध्ये झोपण्याचा सराव करण्यास सांगूनही या विकाराची तीव्रता नियंत्रित ठेवता येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment