असे आहे महाबलशाली मुष्टीयोद्धा खलीचे जीवन

khali
नुकताच आपला ४६वा वाढदिवस साजरा केलेल्या ‘द ग्रेट खली’ या महाबलशाली मुष्टीयोद्ध्याचे मूळ नाव दिलीप सिंह राणा आहे. एके काळी त्यांच्या धिप्पाड शरीरयष्टीवरुन आणि अजस्त्र शरीरावरून लोक त्यांची थट्टा करीत असत. पण आपल्या धिप्पाड शरीरयष्टीच्या जोरावर आणि मुष्टीयुद्धातील कौशल्यामुळे खली जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळवीत महाबलशाली मुष्टीयोद्धा बनले. रेसलिंगच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी खली पंजाब पोलीस खात्यामध्ये कर्मचारी होते.
khali1
खली पहिलवान म्हणून नावाजलेले असले, तरी त्यांचे खानपान इतर पहिलवानांच्या आहारपद्धतीच्या मनाने काहीसे वेगळे आणि साधे आहे. खली यांना कोणतेहे व्यसन नाहीच, शिवाय आजवर कोणताही सामना जिंकण्यासाठी खली यांनी कधीही उत्तेजक पदार्थांचे सेवन केलेले नाही. रेसलिंग जगतामध्ये खली हे सर्वात उंच खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांची उंच तब्बल सात फुट १ इंच इतकी असून त्यांचे वजन १५७ किलो आहे, म्हणजे सुमारे ३४७ पाउंड्स आहे.
khali2
व्यावसायिक रेसलिंग मध्ये खलीने २००० साली पदार्पण केले होते. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ‘जायंट सिंह’ या नावाने ओळखले जात असे. भीमकाय शरीरयष्टी असणाऱ्या खलीला हे नाव शोभत असे. पंजाब पोलीस खात्यामध्ये कर्मचारी असतानाच्या काळापासूनच खली बॉडी बिल्डींग करीत असत. १९९७ आणि १९९८ साली खली यांना मिस्टर इंडियाचा खिताबही मिळाला आहे. जागतिक पातळीवर इतके यश मिळवून देखील खली स्वभावाने अतिशय विनम्र आहेत. त्यांची लोकप्रियता आणि प्रसिद्धी याचा लवलेशही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दृष्टीस पडत नाही.

Leave a Comment