या देशांमध्ये डास नाहीतच !

fly
आपल्याकडे पावसाळा सुरु झाला, की त्याबरोबर सर्दी-खोकला, व्हायरल इन्फेक्शन मुले येणारा ताप, अंगदुखी याचबरोबर प्रमाण वाढते, ते डासांमुळे फैलावणाऱ्या आजारांचे या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू सारख्या आजारांच्या पुष्कळ केसेस पाहायला मिळत असतात. विशेषतः जिथे पाणी वाहून जाण्यासाठी सोयी नाहीत, तिथे पावसाचे आणि इतर सांडपाणी साठून राहिल्याने त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. आसपास असलेला केरकचरा यामध्ये भर टाकत असतोच. म्हणून डासांमुळे फैलावणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसते. मात्र या जगामध्ये काही देश असे ही आहेत, जिथे नावाला ही डास सापडत नाहीत. त्यामुळे डासांच्यामुळे फैलावणारे आजार, या देशांमध्ये पाहायला मिळत नाही.
fly1
प्रशांत महासागराच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये असलेल्या द्वीपांचा समूह न्यू कॅलेडोनिया या नावाने ओळखला जातो. या देशाची जनसंख्या २,६८,००० इतकी असून, या देशांची औपचारिक भाषा फ्रेंच आहे. पर्यटन या देशाचे अर्थार्जनाचे प्रमुख स्रोत असून, स्क्युबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी येथे अनेक उत्तम संस्था आहेत. चहू बाजूंनी अथांग, विशाल सागर, स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे, अतिशय आकर्षक ‘कोरल रीफ्स’ यामुळे पर्यटक आवर्जून भेट देतील अश्या स्थळांपैकी हा देश एक आहे. तसेच येथील हवामान ना जास्त थंड ना जास्त उष्ण असे असल्याने वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत असते. या देशामध्ये डासांचा प्रादुर्भाव जराही नाही.
fly2
युरोप आणि अमेरिकेच्या मध्ये असलेले हे द्वीप उत्तरी अटलांटिक महासागरामध्ये आहे. या द्वीपाला आईसलंड या नावाने ओळखले जाते. हा थंड प्रदेश असून, शीत ऋतूमध्ये येथे सतत बर्फवृष्टी होत असते. इतक्या थंड ठिकाणी डासांची पैदास होणे शक्य नसल्याने या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव नाही. हजारो किलोमीटरचा विस्तार असणारे विशाल सागरी किनारे, आणि अनेक हिमनद्यांनी घेरलेला हा प्रदेश त्या ठिकाणी असलेल्या गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. तसेच या देशामध्ये असलेले अनेक ज्वालामुखी आजच्या काळामध्येही सक्रीय आहेत.
fly3
हिंद महासागरामध्ये असलेला सेशेल्स हा द्वीपसमूह जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे. केवळ ८४,००० जनसंख्या असलेल्या या देशामध्ये फ्रेंच आणि इंग्रज भाषा बोलल्या जातात. याच भाषा या देशाच्या औपचारिक भाषा देखील आहेत. या देशामध्येही डासांचा प्रादुर्भाव अजिबात नाही. दक्षिणी प्रशांत महासागरामध्ये असलेल्या द्वीपसमूह फ्रेंच पॉलीनेशिया या नावाने ओळखला जातो. या द्वीपसमूहातील ताहिती बेट सर्वात लोकप्रिय आहे. अडीच लाखांपेक्षाही जास्त येथील लोकसंख्या असून, येथील औपचारिक भाषा फ्रेंच आहे. जगभरातील पर्यटक या ठिकाणी येत असल्यामुळे पर्यटन हे येथील मुख्य अर्थार्जनाचे स्रोत आहे. या देशामध्ये डासांचा प्रादुर्भाव नावालाही नाही.

Leave a Comment