समस्त मातांना समर्पित ‘आई’ वस्तूसंग्रहालय

Museum
आपल्या देशामध्ये असे ही एक वस्तूसंग्रहालय आहे, जे ‘आई’ ला समर्पित आहे. अगदी प्राचीन काळापासून ते आताच्या आधुनिक काळामध्ये महिलांच्या वापरात असणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. अश्या एकूण पस्तीस हजारांपेक्षा जास्त वस्तू या संग्रहालयामध्ये आहेत. यातील अनेक वस्तू आपण पूर्वी कधीही न पाहिलेल्या, अतिशय प्राचीन अश्याही आहेत. हे वस्तूसंग्रहालय महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई जिल्ह्यामध्ये आहे.
Museum1
या वस्तूसंग्रहालयामध्ये खास मराठमोळ्या संस्कृतीमध्ये आणि अगदी प्राचीन काळामध्ये बहुधा सर्व घरांमध्ये वापरात असणाऱ्या वस्तूंचा मोठा संग्रह आहे. या संग्रहालयाचे संग्राहक डॉक्टर विठ्ठल कामत यांच्या गेल्या तीस वर्षांच्या अथक प्रयत्नांच्या परिणामस्वरूप हे संग्रहालय उभे राहिले आहे. व्यवसायाने डॉक्टर कामत हॉटेलियर आहेत, पण प्राचीन वस्तूंचा संग्रह करण्याचा त्यांचा शौक आज एका सुंदर वस्तूसंग्रहालयाच्या रूपामध्ये आपल्या समोर आहे.
Museum2
‘आई’ असे नाव या वस्तूसंग्रहालयाला देऊन जगभरातील सर्व मातांना हे संग्रहालय समर्पित असल्याचे डॉक्टर कामत सांगतात. या संग्रहालयामध्ये असणाऱ्या वस्तू मिळविण्यासाठी गेली तीस वर्षे सातत्याने प्रयत्न करीत संपूर्ण महाराष्ट्रातील आणि त्याचबरोबर जवळपासच्या राज्यांमधील अनेक गावे डॉक्टर कामतांनी पालथी घातली. त्यांच्या या परिश्रमांचे फल म्हणून हे सुंदर संग्रहालय आज उभे आहे. मात्र हे संग्रहालय अजूनही लोकांच्या तितकेसे परिचयाचे नाही. थेट सतराव्या शतकापासून महिलांच्या वापरामध्ये असणाऱ्या वस्तूंपासून, ते अगदी अलीकडच्या काळामध्ये महिलांच्या वापरातील वस्तू या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात.
Museum3

Leave a Comment