ही आहेत जगातील सर्वात महागडी पेंटिंग्ज

प्रसिद्ध चित्रकारांनी चितारलेली पेंटिंग्ज संग्रही असणे, हे स्टेटस सिम्बॉल समजले जाते, त्यामुळे ही पेंटिंग्ज खरेदी करण्यासाठी जगभरातील धनाढ्य व्यक्ती लाखो डॉलर्स मोजताना पाहायला मिळतात. मात्र या जगातील काही अतिशय प्रसिद्ध समजली जाणारी पेंटिंग्ज कोणाचीही खासगी मालमत्ता नसून, सर्वसाधारणपणे मोठमोठ्या संगाराहालायांमध्ये पहावयास मिळतात. पण म्हणून यांची किंमत कमी असते असे नाही. जर या पेंटिंग्जची किंमत विचारात घेतली, तर ही पेंटिंग्ज जगातील सर्वात महागडी पेंटिंग्ज ठरतील यात शंका नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर पॅरिस येथील जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयामध्ये असलेल्या, लियोनार्डो दा विन्ची ने बनविलेल्या ‘मोनालिसा’चे देता येईल. आजवर अस्तित्वात असलेल्या सर्व कलाकृतींमध्ये ‘मोनालिसा’ चा इन्श्युरन्स सर्वात जास्त किमतीचा असल्याचे म्हटले जाते. २०१६ सालामध्ये ही किमंत ६२० मिलियन डॉलर्स इतकी असल्याचे म्हटले जाते.
paintings
‘पोट्रेट ऑफ अॅडेल ब्लॉख बाऊअर’ हे पेंटिंग १९०३-१९०७ या काळामध्ये बनविले गेले. फर्डिनांड ब्लॉख बाऊआर यांनी हे पेंटिंग बनवविले होते. १९४१ साली हे पेंटिंग नाझींनी चोरले, आणि त्यानंतर हे पेंटीग बेल्वदेअर येथील ऑस्ट्रियन आर्ट गॅलरी मध्ये होते. त्यानंतर मात्र कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ही पेंटिंग ब्लॉख बाऊअर परिवाराला परत देण्यात आले. हे पेंटिंग सुप्रसिद्ध चित्रकार गुस्ताव क्लिम्ट यांनी बनविले होते. हे पोट्रेट बनविताना क्लिम्ट यांनी अस्सल चांदी आणि सोन्याच्या वर्खाचा वापर केला होता. या पेंटिंगची किंमत १५८ मिलियन डॉलर्स इतकी आहे.

विल्हेल्म डे कूनिंग यांनी बनविलेले ‘woman III’ हे पेंटिंग १६१ मिलियन डॉलर्स किंमतीचे आहे. डे कूनिंग यांनी १९४० च्या दशकामध्ये हे पेंटिंग बनविण्यास सुरुवात केली होती. १९५३ साली हे पेंटिंग बनून पूर्ण झाले होते. ‘ग्राफिटी’ स्टाईलमध्ये हे पेंटिंग आणि याच्या जोडीची उर्वरित पाच पेंटिंग्ज चितारली गेली आहेत. १९७० ते १९९० या काळामध्ये हे पेंटिंग तेहरान येथील आर्ट गॅलरी येथे असले, तरी प्रदर्शित केले गेले नव्हते, कारण कोणत्या कलाकृती प्रदर्शित केल्या जाव्यात आणि कोणत्या नाहीत, या बद्दल तेहरान येथे कडक नियम होते. त्यानंतर २००६ साली स्टीवन कोहेन नामक अब्जाधीशाने हे पेंटिंग खरेदी केल्याचे समजते.

रेम्ब्रांट यांनी बनविलेली मेअरटीन सूलमान्स व उप्जेन कॉपिट या पेंटिंग्जच्या जोडीची किंमत १८२ मिलियन डॉलर्स आहे. सध्या ही पेंटिंग्ज पॅरिस येथील लूव्र संग्रहालय आणि रीज्क्सम्युझियम यांच्या संयुक्त मालकीची आहेत. मार्क रोथ्को यांनी बनविलेले ‘ नंबर 6 -व्हायोलेट, ग्रीन अँड रेड ‘ हे पेंटिंग १९४.६ मिलियन डॉलर्स किंमतीचे असून, हे पेंटिंग रशियन अब्जाधीश दिमित्री रायबोलोव्लेव्ह यांनी खरेदी केले होते.

Leave a Comment