आजतागायत उकल न झालेली ही रहस्य

mystry
जगामध्ये अनेक ठिकाणी अनेक रहस्यमय घटना घडत असतात. या घटनांची कधी उकल होते, तर काही घटना नेमक्या कश्या घडल्या हे समजणे मनुष्याच्या आकलनाच्या पलीकडले ठरते. पोर्तुगाल देशातील सिमित्रा या प्रांतामध्ये एक थांग लागणार नाही अशी खोल विहीर आहे. ही विहीर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारी आहे, असे म्हटले जाते. ही विहीर अतिशय खोल असून, या विहिरीमधून सतत एक निळ्या प्रकाशाचा झोत दृष्टीला पडतो असे म्हणतात. ही विहीर अतिशय प्राचीन असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रकाशयोजना केलेली नाही. तरीही हा निळा प्रकाश या विहिरीमधून कसा येतो, या रहस्याची उकल आजवर कोणालाही करता आलेली नाही.
mystry1
‘द ग्रेट ओमार’ नामक रहस्यमयी ग्रन्थ टायटॅनिक वर असून, त्या विशालकाय जहाजाचा अपघात झाल्यानंतर या जहाजाबरोबर या ग्रंथालाही अटलांटिक महासागरामध्ये जलसमाधी मिळाली. जगामध्ये कोणत्या चांगल्या वाईट घटना घडणार आहेत, या बद्दलची भविष्यवाणी या ग्रंथामध्ये असल्याचे म्हणतात. नेपोलियनच्या साम्राज्यापासून ते हिटलरची तानाशाही, आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपर्यंत सर्वच घटनांची भविष्यवाणी या ग्रंथामध्ये असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ चारशे वर्षांपूर्वी लिहिला गेल्याचे म्हटले जाते.
mystry2
अश्वत्थामा कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य याचा पुत्र असून, महाभारतातील अतिशय शूर वीरांपैकी एक होता. पण भारतमध्ये असलेल्या मान्यतेनुसार अश्वत्थामा आजच्या काळातही ही अनेकांना दृष्टीस पडला आहे. विशेषतः नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्या भाविकांना अश्वत्थामा कोणत्या ना कोणत्या रुपामध्ये अवश्य दार्ह्स्ना देतो असे म्हणतात. मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपुराच्या जवळ असारगढ या ठिकाणी असलेल्या प्राचीन शिव मंदिरामध्ये अश्वत्थामा दररोज रात्री पूजा करण्यासाठी येतो अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. दररोज रात्री मंदिराची साफसफाई केल्यानंतर मंदिर बंद केले जाते. पहाटेच्या वेळी जेव्हा मंदिर पुन्हा उघडण्यात येते, तेव्हा शिवलिंगाची यथासांग पूजा झालेली दृष्टीस पडते. या मंदिरामध्ये येण्या-जाण्यासाठी एकच द्वार आहे. इतर कुठल्याही मार्गाने या मंदिरामध्ये प्रवेश करणे शक्य नाही. मंदिर बंद असताना ही अश्वत्थामा मंदिरामध्ये येतो आणि पूजा करून जातो, हा नियम गेली अनेक वर्षे सुरु आहे. मात्र हे नेमके कसे आणि कोणत्या वेळी घडते याची उकल आजतागायत होऊ शकलेली नाही.

Leave a Comment