बदलत्या ऋतुंमध्ये उद्भविणाऱ्या पोटाच्या विकारांवर रामबाण हिंगाचा काढा

stomach
खाण्या-पिण्याच्या वेळेतील अनियमितता, मसालेदार, तेलकट पदार्थांचे सातत्याने सेवन, आणि त्यातून ऋतूबदल या कारणांमुळे अनेकदा पोटाचे विकार उद्भवितात. यामध्ये पोट दुखणे, बद्धकोष्ठ, पित्त अश्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. काही वेळा या समस्याइतक्या बळावतात, की त्या करिता औषधोपचारांची आवश्यकता देखील पडते. पण अनेकदा या औषधांचे देखील दुष्परिणाम होऊ लागतात, जे कालांतराने जाणवू लागतात. हे टाळण्यासाठी पोटाच्या विकारांवर रामबाण इलाज असणारे अनेक उपाय आयुर्वेदामध्ये सांगितले गेले आहेत. मुख्य गोष्ट अशी की या उपायांमध्ये वापरले जाणारे साहित्य आपल्या स्वयंपाकघरामध्येच अगदी सहज उपलब्ध असते. पोटाच्या, किंवा पचनासंबंधी विकारांवरील उपायांपैकी एक अतिशय उत्तम उपाय म्हणजे हिंगाचा काढा.
stomach1
हिंगाच्या काढ्याचे सेवन केल्याने पचानासंबंधी तक्रारी दूर होण्यास मदत होते. हा काढा बनविण्यास अतिशय सोपा असून, तितकाच प्रभावी ही आहे. घरामध्येच अगदी सहज तयार करता येणारा हा काढा सर्वांसाठीच लाभकारी आहे. या काढ्याचे सेवन केल्याने अॅसिडीटी पासून पोटदुखी पर्यंत सर्व तक्रारींपासून आराम मिळण्यास मदत होते. या काढ्याला आयुर्वेदामध्ये हिंगाष्ट्क म्हटले गेले आहे. हा काढा बनविण्यासाठी ओवा, शतपुष्प बीज, हिंग, काळे मीठ, ज्येष्ठमध, आणि सुंठ या साहित्याची आवश्यकता आहे. हे सर्व पदार्थ बाजारामध्ये काष्ठौषधी मिळणाऱ्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात.
stomach2
काढा बनविण्यासाठी अर्धा चमचा ओवा, शतपुष्प बीज अर्धा चमचा, पाव चमचा हिंग, चवीनुसार काळे मीठ, ज्येष्ठमधाचा एक लहान तुकडा, आणि थोडीशी सुंठ हे सर्व साहित्य २५० मिलीलीटर पानामध्ये उकळावे. हा काढा पाच मिनिटे चांगला उकळू देऊन गळून घ्यावा. भोजन झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी या काढ्याचे सेवन केल्याने अन्नाचे पचन सुरळीत होण्यास मदत होते. जर लहान मुलांना पोटदुखी किंवा पचानासंबंधी समस्या असतील, तर त्यांना ही हा काढा द्यावा. त्यामुळे पोटदुखीमध्ये आराम मिळतो. बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी देखील हा काढा उपयुक्त आहे. या काढ्यासोबतच ताजी फळे, भाज्या, आणि फायबरची मात्रा भरपूर असलेले खाद्यपदार्थ आहारामध्ये समाविष्ट केल्यानेही बद्धकोष्ठ दूर होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment