वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्य घटतेय दीड वर्षांनी!

pollution
हवेच्या प्रदूषणामुळे भारतीय नागरिकांचे सरासरी वय दीड वर्षांनी कमी होत असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे. वायू प्रदूषण आणि वायू प्रदूषण आणि आयुष्यकाळ यांच्यातील संबंधाची पाहणी करणारे हे पहिलेच संशोधन होय. जोशुआ आपटे यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले असून एन्व्हायर्मेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्स या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे.

अमेरिकेतील ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. या संशोधकांनी वातावरणात आढळणाऱ्या 2.5 मायक्रॉनपेक्षा छोट्या कणांमुळे (पीएम) होणाऱ्या वायू प्रदूषणाचा अभ्यास केला. हे सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकतात आणि यामुळे हृदयाघात, अपस्मार यांसारखे तसेच कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. पीएम 2.5 प्रदूषण वीजनिर्मिती प्रकल्प, कार व ट्रक, आग, औद्योगिक उत्सर्जनातून होते.

या प्रदूषणामुळे भारतातील व्यक्तींचे सरासरी वय 1.53 वर्षांनी कमी होते, असे संशोधकांना आढळले. त्या तुलनेत बांग्लादेशात 1.87 वर्ष, इजिप्तमध्ये 1.85, पाकिस्तानात 1.56, सौदी अरेबियात 1.48, नायजेरियात 1.28 आणि चीनमध्ये 1.25 वर्षांनी आयुष्य कमी होत असल्याचेही त्यांना आढळले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment