घर नाहीसे करून त्या जागी उभे राहिले मक्याचे शेत- रोमेनियातील अजब घटना

romania
रोमेनिया मधील बुखारेस्ट शहरात राहणाऱ्या अँडी पास्काली याच्या मालकीचे एक घर ब्रेला या ठिकाणी होते. अँडीचे एरव्ही वास्तव्य बुखारेस्टमध्ये असले, तरी सुट्टीच्या काळामध्ये, विश्रांती घेण्यासाठी तो आपल्या परिवारासमवेत आपल्या ब्रेला येथील ‘समर हाउस’ येथे जात असे. काही दिवसंपूर्वी अँडी आपल्या वडिलांसमावेत ब्रेला येथे गेला असताना, तिथे जाऊन त्याने जे दृश्य पहिले, ते पाहून त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ज्या ठिकाणी अँडीचे टुमदार समर हाउस उभे असायला हवे होते, त्या ठिकाणी मक्याचे शेत उभे होते. घराचा तर कुठेच थांगपत्ता नव्हता. घरातून एखादी वस्तू गायब झाली, की जाणवणारी अस्वस्थता आपण सर्वानीच कधी ना कधी अनुभवली आहे. पण अँडी च्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याचे तर संपूर्ण घरच गायब होते.
romania1
अँडीने हे लहानसे, टुमदार घर खरे तर आपल्या वडिलांसाठी बांधवले होते. पण २०१४ सालच्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा अँडी ब्रेला येथे पोहोहाला तेव्हा त्या ठिकाणी फक्त काही विटा, आणि वाळू शिल्लक असून, घर मात्र गायब होते. हे घर बांधून झाल्यानंतर अँडीने या घरामध्ये सर्व सोयी केल्या होत्या. सुरुवातीला या घरामधील फ्रीज, आणि इतर काही वस्तू गायब झाल्या. त्यांनतर अँडीने आपल्या घराच्या भोवती असलेल्या लाकडी कुंपणाच्या भोवती तारेचे आणखी एक कुंपण लावून घेतले. काही महिन्यांनी अँडी परत आल्यानंतर या सर्व वस्तू तर गायब होत्याच, आपण त्याचबरोबर अख्खे घरही गायब होते.
romania2
जिथे अँडीचे घर असायला हवे होते, त्या ठिकाणी त्याच्या शेजाऱ्याने मक्याचे शेत लावले होते. अँडीने या बद्दल पोलिसांकडे तक्रार करूनही त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे सोशल मिडीयाचा आधार घेत अँडीने घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती देत तेथील रहिवाश्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

Leave a Comment