बंदीनंतरही भारतात अशा प्रकारे वापरले जात आहे टीक-टॉक


नवी दिल्ली – सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र गृह मंत्रालयाने शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टीक-टॉकवर बंदी घालण्यात आली होती. पण सध्याच्या घडीला असेही अनेक जण आहेत, जे या अॅपचा सर्रास वापर करताना दिसतात. यासंदर्भात सिमिलस बेवकडून एक डेटा जारी करण्यात आला आहे. याबाबतची माहितीही यातच मिळाली आहे. हे एक ऑनलाईन वेब पोर्टल आहे, जे वेब अॅनालिटिक्स सर्व्हिस प्रदान करते.

त्यांनी ‘डिजिटल ट्रेंड्स’ नावाच्या एका अहवालात सांगितले की सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या तुलनेत डिसेंबर २०२० मध्ये टीक-टॉकवर अधिक भारतीय युझर्स अॅक्टिव्ह होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्च ते जूनदरम्यान लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये टीक-टॉकच्या युझर्समध्ये वाढ दिसून आली. पण यात जुलैनंतर घट होत गेल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त मनी कंट्रोलने दिले आहे. पण या विशेष बाब म्हणजे टीक-टॉक हे अॅप बॅन केले असले तरी या अॅपच्या ऑगस्ट आणि ऑक्टोबरदरम्यान महिन्याच्या अॅक्टिव्ह युझर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली. अनेक जणांकडून बंदीनंतरही याचा वापर कसा केला जात आहे.

युझर्सना नव्याने टीक-टॉक हे अॅप डाऊनलोड करता येणार नव्हते. जर हे अॅप एखाद्या व्यक्तीने डिलीट केले असेल तरी त्याला ते पुन्हा इन्स्टॉल करता येणार नाही. परंतु हे अॅप ज्यांच्याकडे पूर्वीपासून मोबाईलमध्ये आहे ते आताही या अॅपचा वापर करू शकतात, अशी माहिती बेक्सले अॅडव्हाझर्सचे कार्यकारी अध्यक्ष उत्कर्ष सिन्हा यांनी सांगितले.

टीक-टॉकवर जरी बंदी असली तरी यावर सातत्याने अॅक्टिव असणारे लोक ते अॅप डाऊनलोड करण्यासाठी इतर मार्गांचा वापर करत आहेत. अन्य वेबसाईटवरूनही या अॅपची .apk फाईल ही डाऊनलोड केली जाऊ शकते, अशी माहिची डिजिटल ऑडिओ प्लॅटफॉर्म खबरीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित शर्मा यांनी दिली. याव्यतिरिक्त याचा वापर करण्यासाठी VPN चा वापर करणे देखील शक्य आहे.

कोणताही युझर याद्वारे बॅन असतानादेखील ते कंटेंट सहरित्या अॅक्सेस करू शकत असल्याची माहिती सायबर वकिल जोनिस वर्गिस यांनी सांगितले. आता अनेकांना पूर्वीच्या तुलनेत VPN ची माहिती आहे. ते सेट करणारे अनेक अॅप्स आज मोफतही मिळतात. याद्वारे त्या साईटपर्यंत पोहोचणे शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कंटेंटचे चांगले नाव आहे. टीकटॉक हा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. भारताच्या बाहेर दुबई, नेपाळ, श्रीलंकेसारख्या देशांमध्येही हा अतिशय लोकप्रिय आहे. या ठिकाणी लोकांना भारतीय कंटेंट अधिक आवडतो. त्याचबरोबर बॅन झाल्यानंतरही अॅपचा वापर करू शकत नसले तरी अनेक फेमस लोकांचे फॉलोअर्सही वाढल्याची माहिती एमएडी इन्फ्ल्यूएन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम माधवन यांनी दिली.