मधुर भंडारकर घेऊन येत आहेत देशातील लॉकडाऊनवर आधारित चित्रपट


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लोकांना त्या काळात अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांवर उपासमारीची त्याचबरोबर बेरोजगारीच्या समस्या उभ्या राहिल्या होत्या. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते संपूर्ण शहरे बंद होती. आता याच सर्व परिस्थितीवर एक चित्रपट तयार करण्यात येणार आहे आणि हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार आहे.


नुकत्याच या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे नाव ‘इंडिया लॉकडाऊन’ असे असणार आहे. या चित्रपटाचे मधुर भंडारकर हे निर्माते आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज करण्यात झाला आहे. तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. प्रतिक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, सई ताम्हणकर, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

पुढील आठवड्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. इंडिया लॉकडाउन चित्रपटाची निर्मिती भांडारकर एंटरटेनमेंट आणि पीजे मोशन पिक्चर्स करत असून एका महिन्यापूर्वी मधुर भंडारकर यांनी इंडिया लॉकडाऊन चित्रपटाची घोषणा केली होती. वृत्तानुसार, या चित्रपटाचे बहुतेक शूटिंग मुंबई व आसपासच्या भागात होणार आहे.