चिरतरुण ठेवण्याबरोबर आरोग्यासाठी लाभकारी खारीक

dates
सुका मेवा म्हटले कि आपल्याडोळ्यासमोर चटकन बदाम, काजू, पिस्ते येतात. मात्र खारीक आपण थोडी दुर्लक्षित ठेवली आहे. आपण चिरतरुण दिसावे यासाठी अनेक उपाय करून पाहतो, मात्र त्यासाठी बहुगुणी खारीक खूप फायदेशीर ठरते शिवाय आरोग्यासाठी ती खूपच लाभकारी आहे. काय आहेत खारीक सेवनाचे फायदे हे जाणून घेऊ.

skin
आयुर्वेदानुसार त्वचेसाठी खारीक पोषणदायी असून ती त्वचा कोरडी पडण्यापासून बचाव करते. दुधाबरोबर रोज ४ ते ५ खारका उकळून खाल्ल्या तर त्वचा सैल पडत नाही आणि त्यामुळे सुरकुत्या येत नाहीत. परिणामी त्वचा तजेलदार आणि तरुण दिसते.

manstual
मासिक पाळीचा त्रास होणाऱ्या महिला मुलींसाठी खारीक वरदान आहे. ज्यांना पाळी नियमित येत नाही त्यांनी रोज ३ ते चार खारका खाल्ल्या तर काही काळात हा त्रास दूर होतो. कंबरदुखी, संधिवात असणाऱ्यांनी रोज खारीक खाल्ली तर हाडे मजबूत होतात शिवाय शिरांमध्ये असेलेले अडथळे दूर होऊन रक्तप्रवाह सुरळीत राहतो. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी रोज ३-४ खारका गरम पाण्याने धुवाय, त्यातील बी काढून त्या गाईच्या दुधात उकलाव्या आणि हे मिश्रण प्यावे.

cold
ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांनी रोज सकाळी ३ खारका खाव्या आणि त्यावर गरम पाणी प्यावे. त्रास कमी होतो. बरीच लहान मुले अंथरूण ओले करतात, त्यांना रात्री झोपण्यापूर्वी अर्धातास खारीक खायला द्यावी. त्याने हा विकार दूर होतो. डोळ्याचे इन्फेक्शन झाले असल्यास अथवा रांजणवाडी झाल्यास खारीक उगाळून त्याचा लेप द्यावा.सर्दी पडसे, अॅलर्जी झाल्यास खारीक सेवन उपयुक्त ठरते. कारण खाराकेत सल्फर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यांना जास्त थंडी वाजते. त्यांनी खारीक खाल्ली तर त्यामुळे शरीरातील उष्णता वाढण्यास मदत होते.

Leave a Comment