मराठा आरक्षणाचा निर्णय पुन्हा लांबणीवर


नवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. घटनापीठाने आजच्या सुनावणीत कोणताही निर्णय दिला नसून, 5 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

आजच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे 25 जानेवारी रोजी होणारी सुनावणी घेण्यात आली. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे ही सुनावणी पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या वतीने वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. मराठा आरक्षणावरील सुनावणी सोमवार 25 जानेवारीपर्यंत तहकूब करण्याची मागणी केल्यानंतर घटनापीठाच्या न्यायमूर्तीने चर्चा करून पुढील सुनावणीही 5 फेब्रुवारीला घेण्यात येईल, असे नमूद केले आहे.