विराटच्या ट्विटर बायोमधून ‘भारतीय क्रिकेटपटू’ शब्द गायब


नवी दिल्ली – भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील आपला शेवटचा कसोटी सामना खेळत असून महिन्याभरापेक्षाही मोठ्या असलेल्या या दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा असणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यानंतर मायदेशी परतणार आहे. सध्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळत आहे. कारण विराट कोहलीची पालकत्व रजा घेतली. जानेवारी महिन्यात विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देईल, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवल्यामुळे पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतला. त्यानंतर पुढील दोन कसोटींमध्ये भारतीय संघाने त्याच्या अनुपस्थितीत उत्तम कामगिरी केल्यानंतर विराटने आपल्या ट्विटरच्या बायोमधून अचानक भारतीय क्रिकेटपटू शब्द हटवल्याचा प्रकार घडला आहे.

काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले. गेल्या सोमवारी अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी चाहत्यांना विराटने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. कळविण्यास खूप आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली असल्याचा संदेश त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. त्यानंतर नुकताच त्याने आपल्या ट्विटरवरील बायो म्हणजेच आपल्या बद्दल देण्यात येणारी माहिती बदलल्याची गोष्ट घडली.

विराट कोहलीचे अधिकृत ट्विटर अकाऊंट, भारतीय क्रिकेटपटू, खेळाडू, कारचा चाहता, फुटबॉल आवडणारा आणि सदैव उत्साही, असा उल्लेख त्याच्या आधीच्या बायोमध्ये होता. विराटने आता त्याच्या बायोमधून हे सारे काढून टाकले आहे. त्याच्या जागी विराटने नवा बायो लिहिला. त्या बायोचा थेट अनुष्का आणि त्यांच्या मुलीशी संबंध आहे. विराटने नव्या बायोमध्ये अभिमान वाटावा असा पती आणि वडिल!, असे लिहिले आहे.