जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपचा एकतर्फी विजय


सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांची म्हैसाळ ही सासुरवाडी आहे. 17 जागांच्या या ग्रामपंचायतीत जयंत पाटील यांचे पाहुणे राऊळे उभे होते. पण येथे भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपचा जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायतीत एकतर्फी विजय झाला.

भाजपला म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 15 तर राष्ट्रवादीला फक्त 2 जागांवर विजय मिळाला. त्याचबरोबर म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. भाजपने येथे सत्ता खेचून आणली असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सासुरवाडीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. जयंत पाटलांचे मेहुणे मनोज शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जयंत पाटील यांचा लहान मेहुणा, मोठ्या मेहुण्याची पत्नी आणि मेहुण्याची मुलगी पराभूत झाली.

दरम्यान, जयंत पाटील यांचे मेहुणे, मेहुण्यांची पत्नी आणि मेहुण्यांची मुलगी अशा एकूण सर्वांचाच पराभव झाला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जाणाऱ्या असाल्या तरी जयंत पाटील यांच्या नातेवाईकांचा झालेला हा पराभव सध्या चर्चाचा विषय ठरतो आहे.