मूत्रपिंडाच्या तीव्र आजारापासून व्हिटॅमिन बी-३मुळे होऊ शकते सुटका

vitamin
न्यूयॉर्क – तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडावर इलाज म्हणून व्हिटॅमिन बी-3चे योग्य प्रमाणातील सेवन काम करू शकते असे संशोधन कमी उत्पन्न असलेल्या देशातील ३० ते ४० टक्के रुग्णालयात दाखल असलेल्या प्रौढांचा अभ्यास करून करण्यात आले आहे. तीव्र मूत्रपिंडाचा आजार विशिष्ट उपचाराअभावी बळावत जातो. आपल्या रक्तात मिसळणारे चुकीचे घटक आणि द्रव पदार्थांचा असमतोल याला कारणीभूत असतो.

निष्कर्षांनुसार व्हिटॅमिन बी-३चे निकोटीनमाइड एडेनीन डीन्यूक्लिओटाईड (एनएडी+)च्या स्तरानुसार सेवन केल्यास मूत्रपिंडाची तीव्रता कमी होते. आम्ही मूत्रपिंडाचा उच्च धोका असलेल्या रुग्णांच्या मूत्रामध्ये एनएडी+ मधील एक घटक शोधू शकलो. यातील काही रुग्ण अतिदक्षता विभागात होते तर काहींवर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. यात असे आढळून आले, की धोका असलेल्या रुग्णांमध्ये व्हिटॅमिन बी-३ हे सुरक्षितपणे एनएडी वाढवू शकते, असे हार्वर्ड विद्यापीठात नेफ्रॉलॉजिस्ट आणि सहयोगी प्राध्यापक असेलेले समीर एम. पारीख यांनी सांगितले.

निष्कर्ष काढण्याची खूप घाई होत आहे. पण आलेल्या निकालातून हे स्पष्ट होते, की एनएडी+ साठी आपण एक दिवस नॉन इन्व्हेसिव्ह चाचणी करू शकतो. कदाचित एनएडी+ ची पातळी वाढवून आपण यावर इलाजही करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. हे संशोधन नेचर मेडिसीन या जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून टीमने या अभ्यासात एका माऊस मॉडेलद्वारे तीव्र मूत्रपिंडावर संशोधन केले. त्यानंतर कमी क्यूआरपीटीसह एक मॉडेल तयार करण्यात आले. यात दिसून आले, की एन्झाइममुळे क्विनोलिनेटचे एनएडीमध्ये रूपांतर होते. मात्र, यामुळे मूत्रपिंडाचा आजार बळावत नाही.

टीमला त्यानंतरच्या ह्यूमन स्टडिजमध्ये मोठी शस्त्रक्रिया होत असणाऱ्या रुग्णांमध्ये हाय युरिनरी क्विनोलिनेट आढळून आले. तसेच अति-दक्षता विभागातील तीव्र मूत्रपिंडाच्या उपचारासाठी दाखल असलेल्या ३२९ रुग्णांचाही अभ्यास करण्यात आला. टीमने यानंतर हृद्याची शस्त्रक्रिया झालेल्या ४१ रुग्णांना व्हिटॅमिन बी-३ची मोठ्या प्रमाणातील मात्रा दिली. यातून असे आढळून आले, की व्हिटॅमिन बी ३चे सेवन रुग्णांना सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment