घामाच्या दुर्गंधीने हैराण? आहारातून हे पदार्थ वगळणे ठरू शकते उपयुक्त

smel
उन्हाळ्याच्या दिवसात सतत घाम येणे आणि त्या घामची दुर्गंधी या गोष्टी हैराण करणाऱ्या असतात. या मागे अनेक कारणे असू शकतात. वर्कआउट, शारीरिक किंवा मानसिक तणाव, आहार, आणि हार्मोन्सचे असंतुलन या आणि अशा अनेक कारणांमुळे घामाची दुर्गंधी सतावू शकते. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्या आहारातून काही खाद्य पदार्थ वगळल्याने फायदा होऊ शकतो.
smel1
दुध आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पण यामध्ये कोलीनची मात्रा जास्त असल्याने यामुळे शरीरामध्ये दुर्गंधी उद्भवू शकते. त्यामुळे घाम येऊन शरीरातून दुर्गंधी येत असेल, तर आहारातून दुधाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. दुधाच्या ऐवजी दह्याचा किंवा ताकाचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांदा आणि लसूण यांचे सेवनही कमी करावे. तसेच घामाची दुर्गंधी सतावत असल्यास आपल्या आहारामध्ये दालचिनी आणि इलायचीचा समावेश करावा.
smel2
शरीरातून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी मद्यपान टाळायला हवे. तसेच कॉफीचे अतिसेवनही टाळायला हवे. त्याऐवजी लिंबू सरबताचे सेवन केल्याने त्यामुळे शरीरातील अपायकारक घटक बाहेर पडण्यास मदत होते. कॉफीच्या ऐवजी ग्रीन टी किंवा एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घालून त्याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होते. शरीरातून घामाची दुर्गंधी सतावत असल्यास एका पातेल्यामध्ये कडुनिंबाची पाने उकळून घ्यावीत व हे पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळावे. या पाण्याने स्नान केल्याने शरीराची रंध्रे मोकळी होऊन, दुर्गंधी निर्माण करणाऱ्या किटाणूंचा नायनाट होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment