चक्क जुन्या टीव्ही सेट्सनी बनल्या आहेत या घराच्या भिंती

TV
लहान लहान घरे किंवा मोठमोठ्या इमारती सिमेंट आणि विटांचा वापर करून बांधल्या जाताना आपण नेहमीच पाहतो. मात्र एक घर असे ही आहे, ज्याच्या भिंती विटांनी, सिमेंटनी बनविल्या गेलेल्या नसून, जुन्या टीव्हींनी बनविल्या गेल्या आहेत. सध्या सोशल मिडीयावर व्हियेतनाम मधील या घराची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. या घराच्या सर्व भिंती विटांनी बनल्या नसून टीव्हींनी बनल्या असल्यामुळे या घराबद्दल सर्वांच्या मनामध्ये विलक्षण कुतूहल निर्माण झाले आहे.
TV1
व्हियेतनाममधील होन थोम या द्वीपावर हे घर बनले असून, हे घर तिथे राहणाऱ्या रहिवाश्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. या द्वीपावर राहणाऱ्या एका टीव्ही मेकॅनिककडे भरपूर जुने टीव्ही सेट्स साठून राहिले होते. पण जेव्हा वादळ येऊनही बाहेर ठेवलेल्या या टीव्हीसेट्स ना कोणतीही हानी पोहोचू शकली नाही, तेव्हा या टीव्ही मेकॅनिकच्या घरमालकाने चक्क या टीव्ही सेट्सच्या मदतीने त्याच्या घराच्या भिंती उभारण्याचे ठरविले.
TV2
या द्वीपावर आपल्या परिवारासोबत सुट्टीसाठी गेलेल्या एका प्रवाश्याने हे घर पहिले, आणि हे अजब घर पाहून त्यांनी या घराची छायाचित्रे टिपली आणि ही छायाचित्रे त्यांनी ‘फियरलेस डॉग्स’ नामक एका लोकप्रिय वेबसाईटवर प्रसिद्ध केली. ही छायाचित्रे लवकरच व्हायरल झाली आणि त्यावर जगभरातून अनेक प्रतिकियाही आल्या. काहींनी घर बनविण्याच्या या अद्भुत कल्पनेचे कौतुक केले, तर अश्या प्रकारची घरे उभारणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने तर धोक्याचे आहेच, शिवाय घरातील लोकांच्या करिताही हे धोकादायक ठरू शकते अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया युजर्सनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment