फ्रान्सिस्को – स्मार्ट चष्मांचे नवीन व्हर्जन मायक्रोसॉफ्ट लवकरच बाजारात आणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या ग्लॅबेला नाव असलेल्या या चष्म्याच्या साह्याने रक्तदाब मोजता येणार आहे.
आता मायक्रोसॉफ्टचा चष्मा मोजणार रक्तदाब
ऑप्टिकल सेन्सर्स, मायक्रो प्रोसेसर, मेमरी स्टोरेज ग्लॅबेलामध्ये बसवण्यात आले असून वापरकर्त्याच्या सवयी जाणून घेण्यासाठी ज्याची मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह व मेंदूवर ग्लॅबेलाच्या मदतीने लक्ष ठेवता येते. त्याचबरोबर पल्स ट्रान्झिट वेळेची अचूक माहिती यातील सेन्सर्सच्या मदतीने मिळवता येते. हृदयाच्या रक्तप्रवाहावर ज्यामुळे लक्ष दिले जाते. रक्तदाब माहिती करण्यास याचा फायदा होतो.
सध्या ग्लॅबेलाच्या नवीन व्हर्जनचे परीक्षण सुरू असल्यामुळे हा चष्मा बाजारात येण्यास थोडा वेळ लागणार असल्याचे मायक्रोसॉफ्टकडून सांगण्यात आले आहे. अगदी सामान्य चष्म्यासारखा ग्लॅबेला लवकरच तयार करण्यात येणार आहे. ग्लॅबेलामध्ये छोट्या बॅटरीचा उपयोग करण्यात आला आहे.