धूम्रपान करणाऱ्या बाबांमुळे त्यांच्या मुलांची फुफ्फुसे खराब होण्याचा धोका

smoking
न्यूयॉर्क – वारंवार धूम्रपान करणाऱ्या बाबांमुळे त्यांच्या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती एका अमेरिकन संशोधनातून पुढे आली आहे.

या संशोधनानुसार, जे लोक धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यात लहानपणापासून राहतात, त्यांच्यापैकी ३१ टक्के लोकांचा क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मोनरी डिसीझमुळे मृत्यू होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या नऊ टक्के व्यक्तींना मृत्यूचा धोका असतो. यामध्ये गंभीर हृदयरोग होऊन २७ टक्के, हृदयाचा झटका येवून २३ टक्के आणि सीओपीडीमुळे ४२ टक्के व्यक्ती मृत पावतात.

याबाबत माहिती देताना अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या एपिडेमायोलॉजिस्ट डब्लू रॅन डायव्हरने सांगितले, वारंवार धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसे खराब होऊन प्रौढांमध्ये क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मोनरी डिसीझचे प्रमाण वाढते आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. ५० ते ७४ वर्षाचे धूम्रपान न करणारे ७०,९०० स्त्री-पुरुषांची मदत या संशोधनासाठी घेण्यात आली होती. सलग २२ वर्ष या सर्वांवर अभ्यास करून हे संशोधन पूर्ण करण्यात आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment