धक्कादायक; टॉयलेटपेक्षाही जास्त जंतू मोबाईलच्या स्क्रीनवर

bacteria
लंडन – कमोडवर नसतील त्याच्या कित्येक जास्त पटीने जीव जंतू आपल्या जवळ असलेल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर असतात. आरोग्यावर याचा विपरीत परीणाम होत असल्याचे स्काय संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, ३५ टक्क्यांहून अधिक लोक आपल्या फोनची स्क्रीन कधीच साफ करत नाही. सहा महिन्यातून एकदा फक्त चार टक्के लोक फोनची स्कीन स्वच्छ करतात. आयफोन, सॅमसंग, गुगल कंपनीच्या फोनचा नमुना म्हणून अभ्यासाकरिता वापर करण्यात आला होता. फोनच्या स्क्रीनवरील जंतूच्या प्रमाणात त्यादरम्यान साम्य आढळले होते. आरोग्यावर याचा विपरीत परीणाम होत असल्यामुळे त्वचा रोगासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

२४ युनिट्स जंतू शौचालय किंवा फ्लशवर आढळतात. पण फोनच्या स्क्रीनवर तिप्पट म्हणजे तब्बल ८४.९ युनिट्स असल्याचे दिसून आले. नेहमीच आपल्या संपर्कात येणाऱ्या की-बोर्ड आणि माऊसवरही ५ युनिट्स आणि घरातील बटणांवर १० युनिट्स जंतू असतात. लहान मुलांमध्ये फोनसोबत खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय आपल्याकडून फोनचा वापर कामापेक्षा जास्त केला जात असल्याचे दिसून आले आहे. याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.

Leave a Comment