बहुगुणकारी पारिजातक

jasmin
पारिजातकाला स्वर्गीचे फूल म्हणण्यात आले आहे. हे फुले सूर्यास्तानन्तर आणि अगदी पहाटेच्या वेळी उमलतात, आणि या फुलांच्या सुगंधाने सर्व परिसर कसा बहरून जातो. पारिजातकाचे फुल, पाने, बिया, इतकेच नव्हे तर त्या झाडाच्या खोडाची साल देखील औषधी मानली गेली आहे. यापासून बनविला गेलेला काढा केवळ चविष्टच नाही, तर शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी ही आहे. पारिजातकाचे फुल त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील उपयोगी आहे.
jasmin1
पारिजातकाच्या फुलाचा रस, किंवा यांपासून बनविलेल्या काढ्याचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आणि हर तऱ्हेच्या व्याधीचा सामना करण्यासाठी शरीर सक्षम बनते. तसेच पोटामध्ये जंत होणे, केसगळती, आणि महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरही हा काढा उपयुक्त आहे. पारिजातकाची सहा सात पाने स्वच्छ धुवून, वाटून घ्यावीत. ही पाने वाटून घेतल्यानंतर ही पेस्ट पाण्यामध्ये घालून उकळावी. हे पाणी अर्धे राहीपर्यंत उकळावे. हे पाणी थंड झाल्यानंतर गाळून घेऊन बाटलीमध्ये भरून ठेवावे. दरोज सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी घेतल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.
jasmin2
हा काढा प्यायल्याने घसा दुखणे आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो. जर हा काढा उपलब्ध नसेल, तर पारिजातकाची पाने साध्या, नेहमीच्या चहामध्ये उकळून हा चहा घेतल्यानेही खोकला बरा होण्यास मदत होते. या चहामध्ये साखरेच्या ऐवजी मध घातल्याने आणखी फायदा होतो. पारिजातकाच्या पानांचा काढा सायटिका च्या दुखण्यामध्येही फायदेशीर आहे. हा काढा सकाळ संध्याकाळ घेतल्याने आठवड्याभरात आराम मिळतो. मूळव्याधीच्या तक्रारीमध्येही पारिजातकाच्या बियांचे सेवन लाभकारी म्हटले जाते.
jasmin3
पारिजातकाची फुले आणि पाने त्वचेच्या सौंदर्याकरिता लाभकारी समजली जातात. यांच्या उपयोगाने त्वचा नितळ आणि चमकदार होते. दम्याचा विकार असल्यास पारिजातकाच्या खोडाच्या सालीचे चूर्ण बनवून त्याचे सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळी सेवन केल्यास लाभ होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment