या वस्तू मूळच्या या देशांमधील नाहीतच

world
आपल्या माहितीतील अनेक वस्तू अश्या आहेत, ज्या काही ठराविक ठिकाणच्या खासियती समजल्या जातात. ज्याप्रमाणे रसगुल्ले म्हटल्यावर बंगाल किंवा ओडिशाशी त्याचा संबंध जोडणे साहजिक आहे, त्याचप्रमाणे काही वस्तू अश्या आहेत ज्या काही ठराविक देशांच्या खासियती समजल्या जातात. मात्र या वस्तू त्या देशाची खासियत असली, तरी त्या मूळच्या तिथल्याच असतील असे मात्र नाही.
world1
कॉफी हे आपल्या सर्वांचेच आवडते पेय आहे. कॉफीचा उगम मॅडगास्कर येथे झाला असल्याची सर्वसाधारण समजूत असली, तरी कॉफी मूळची इथियोपिया येथील आहे. काफ्फा या इथियोपियन प्रांतामध्ये राहणाऱ्या ओमार नामक संताने कॉफीचा शोध लावला. काफ्फा या शब्दाचा अर्थ ‘ बियांपासून बनविले गेलेले पेय’ असा आहे. काफ्फा येथे राहणाऱ्या ओमार नामक शेख केवळ आपल्या प्रार्थनांच्या जोरावर आजारी लोकांना बरे करू शकत असे अशी मान्यता होती. ओमार वनवास भोगीत असताना तो एका झाडाची लहान लहान फळे खाऊन गुजराण करीत असे. पण ही फळे चवीला कडू होती असल्याने ती चावून खाणे शक्य नव्हते. म्हणून ओमारने ही फळे पाण्यामध्ये उकळून त्या पेयाचे सेवन केल्यानंतर त्या पेयाने भूक शमत असून, शरीरामध्ये चैतन्य, उत्साह जाणवित असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर हे पेय प्रसिद्ध झाले आणि अर्थातच ही फळे, किंवा बिया निर्यात केल्या जाऊ लागल्या. अश्या रीतीने कॉफीचा उगम झाला, आणि ती जगभर जाऊन पोहोचली.
world2
भारतातील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली मिरची पोर्तुगीझांनी भारतामध्ये आणली खरी, पण वास्तविक हा पदार्थ पोर्तुगीझ मुळाचा नसून, मेक्सिको येथील आहे. पोर्तुगीज व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने निरनिरळ्या प्रांतांमध्ये गेले, आणि त्यांच्या बरोबर मिरची देखील जगभर जाऊन पोहोचली. भारतामध्ये मिरचीचे आगमन पंधराव्या शतकामध्ये झाले. त्यामुळे मिरची मूळची भारतातील नसून, भारताबाहेरची आहे.
world3
आजकाल वर्तमान पत्रांतून किंवा मोबाईल फोन्स वर सुडोकू हा खेळ अतिशय लोकप्रिय होत आहे. हा खेळ नावावरू जरी जपानी मुळाचा वाटत असला, तरी हा खेळ मूळचा अमेरिकन आहे. इंडियन येथे राहणाऱ्या, व व्यवसायाने स्थापत्यविशारद असणाऱ्या ७४ वर्षीय हॉवर्ड गार्न्स यांनी सुडोकूची कल्पना अस्तिवात आणली. हे कोडे सर्वप्रथम १९७९ साली ‘डेल मॅगझिन; मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. हा खेळ आणि ह्यातील कोडी लवकरच लोकप्रिय झाली. जपान देशामध्ये या खेळाची लोकप्रियता फारच झपाट्याने पसरली आणि त्यामुळे हा खेळ मूळचा तिथलाच असावा अशी समजूत झाली.
world4
जर्मन चॉकलेट केक हा पदार्थ देखील मूळचा जर्मन नसून, अमेरिकेतील जर्मन नामक व्यक्तीने सर्वप्रथम तयार केला होता. या केक वर असणारे कोकोनट-पीकॅन चे आयसिंग या केकची खासियत समजले जाते. सॅम्युअल जर्मन नामक व्यक्तीने व्यक्तीने या केकचा बेकिंग फॉर्म्युला प्रथम तयार करून त्यानंतर हा फॉर्म्युला त्याने बेकर्स चॉकोलेट कंपनीला विकला. पण जर्मन चॉकोलेट केक असे नाव असल्याने हा केक मूळचा जर्मनीतील असावा असे वाटते.

Leave a Comment