मुंबई – भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेली अटकेमुळे निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची विरोधक वारंवार मागणी करत आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप गंभीर असून पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले आहे. तर नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप नसल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली आहे. यादरम्यान इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात असल्याचा टोला भाजपा नेते निलेश राणे यांनी लगावला आहे.
इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत – निलेश राणे
काय चाललंय महाराष्ट्रात??? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं. https://t.co/mL4E5jS1cA
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 14, 2021
ट्विट करत निलेश राणे यांनी म्हटले आहे की, काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावे.
मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 14, 2021
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईचे श्रेय निलेश राणे यांनी यावेळी नरेंद्र मोदींना दिले आहे. मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.
यादरम्यान मुंडे यांच्यावर आरोपाला नवी कलाटणी मिळाली असून भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने फोन केल्याचा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.