उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार बसप; मायावती यांची घोषणा


नवी दिल्ली – देशात उद्यापासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार असून, बहुजन समाज पक्षाच्या (बसप) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनीही कोरोना लसीकरणाचे स्वागत करत देशात कोरोना लस मोफत देण्यात यावी, यासाठी मायावती यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

बसपाचे सरकार उत्तर प्रदेशात स्थापन झाले तर, राज्यातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन मायावती यांनी दिले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसप युती करणार नसुन, विधानसभा स्वबळाबर लढवणार असल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याआधी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मोठ्या पार्टीसोबत युती न करून लहान पक्षांसोबत निवडणुक लढवणार असल्याचा इशारा दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा यांनी सोबत मिळवूण लोकसभा लढवली होती. त्यात सपाला फक्त 5 जागा मिळवता आल्या होत्या.