कोविड लसीमुळे नुकसान झाल्यास उत्पादक कंपनी भरपाई देणार

देशात १६ जानेवारी पासून कोविड १९ लसीकरणाची सुरवात होत असून लसीकरणाची पूर्ण तयारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा केली गेली आहे. त्यानुसार लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही नुकसान पोहोचले तर त्याची भरपाई लस उत्पादक कंपनी कडून केली जाणार आहे. देशात सध्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्या करोना लसीसाठी परवानगी दिली गेली आहे. लसीकरणाची सुरवात फ्रंटलाईनवरील ३ कोटी स्वास्थ आणि संरक्षण कर्मचाऱ्यांना लस देऊन होणार आहे.

लसीकरणाच्या सध्याच्या कार्यक्रमानुसार त्यानंतर ५० वर्षावरील २७ कोटी नागरिक, अन्य गंभीर आजाराने पिडीत ५० वर्षाखालील रुग्ण यांना लस दिली जाईल. नागरिकाच्या वयाची ओळख लोकसभा अथवा विधानसभा मतदार यादीवरून केली जाणार आहे. या पैकी कुणी रूग्णांलयात भरती असले, आजाराने आयसीयु मध्ये असेल, जनरल ओपीडी मध्ये दाखल असेल त्यांना लस दिली जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

लस घेणाऱ्या व्यक्तीला दोन्ही डोस एकच कंपनीच्या लसीचे घेणे बंधनकारक आहे. पाहिला डोस एका कंपनीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीचा असे करता येणार नाही.