Signal अॅपवर असा Transfer करा WhatsApp Group


नव्याने आलेल्या सिग्नल अॅपला सध्या मोठी पसंती मिळत आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी धोरणाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. जगभरातील लोकांचा व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी धोरणाविरूद्ध रोष कमी होत नाही. याच दरम्यान दुसरीकडे मेसेज अ‍ॅप सिग्नल बर्‍यापैकी लोकप्रिय होत आहे. पण बर्‍याच वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स सिग्नलमध्ये कसे ट्रान्सफर करायचे हे माहित नाही. सिग्नलमध्ये आपला व्हॉट्सअॅप ग्रुप कसा ट्रान्सफर कराल याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

सिग्नल अ‍ॅप देखील व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे एक इंस्टंट मेसेजिंग अॅप असून या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे शेवटपर्यंत सर्व मेसेजेस त्यात एन्क्रिप्ट केलेले आहेत. म्हणजेच केवळ प्रेषक आणि प्राप्तकर्ता संदेश पाहिले जाऊ शकतात. इतर कोणतीही व्यक्ती संदेश पाहू शकत नाही. या अ‍ॅपमध्ये व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच फोटो, व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल आणि फाइल देखील ट्रान्सफर करता येते.

आपण प्रथम सिग्नलमध्ये एक नवीन ग्रुप तयार करणे आवश्यक आहे. आता या ग्रुपच्या सेटींग्स​​वर जा आणि ग्रुप लिंक्सवर क्लिक करा. ग्रुप लिंक ऑन करा आणि आपल्या जुन्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ती लिंक शेअर करा. जेणेकरुन तुमचे फ्रेंड्स ती लिंक जॉईन करतील. शेअर केलेली लिंक ग्रुपचे सदस्य सिग्नल ग्रुपशी थेट कनेक्ट होऊ शकतात. दरम्यान, भारतातील वापरकर्त्यांसाठी सिग्नल अनेक नवीन वैशिष्ट्येपूर्ण काही फीचर्स सुरु करणार आहे.