धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे; निलेश राणेंची मागणी


मुंबई : बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता विरोधकांकडून राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनात कोणी काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत, तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, असे भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटले आहे.

बलात्काराचे आरोप धनंजय मुंडे यांच्या यांच्यावर झाल्यानंतर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी खुलासा केला होता. त्याच खुलाशाच्या आधारावरुन त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार माहिती लपवणे हा गुन्हा समजला जातो. या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी आग्रही मागणी निलेश राणे यांनी केली आहे.