कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधितांची संख्या शंभरी पार; आरोग्य मंत्रालयाची माहिती


नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जगभरात पुन्हा एकदा खळबळ उडालेली असतानाच या नव्या स्ट्रेनने बांधितांची भारतातील संख्या १०९ वर पोहोचली असल्याची माहिती माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनने काळजीत भर टाकली आहे. या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या भारतात आता शंभरी पार गेली आहे. दरम्यान, मुंबईतील तीन रुग्णांमध्ये नुकताच अशा प्रकारचा विषाणू आढळून आला आहे, ज्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नसल्याचे एका रिपोर्टमधून समोर आल्याचे माध्यमांमध्ये चर्चिले जात होते.

तज्ज्ञ मंडळीचे म्हणणे आहे की, हा नवा म्यूटेंट जास्त धोकादायक नाही. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे डॉ. गिरिधर बाबा यांचे म्हणणे आहे की, हा म्यूटेंट सप्टेंबरमध्येच भारतात दाखल झाला आहे. जर हा एवढाच धोकादायक असता तर आतापर्यंत भारतात हाहाकार माजला असता.