काळा पैसा, करचुकवेगिरी माहिती द्या- ५ कोटींचे इनाम मिळवा

फोटो साभार ई चौक

लाचलुचपत, काळा पैसा, करचुकवेगिरी करणाऱ्या लोकांची माहिती देण्यासाठी मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ५ कोटी रुपये इनाम देण्याची योजना आखली आहे. थोडी मेहनत आणि धैर्य दाखविणारे सर्वसामान्य नागरिक सुद्धा यात सामील होऊ शकणार आहेत. ही माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. शिवाय कुठेही न जाता घरबसल्या आयकर विभाग ई फायलिंग वेबसाईटवरून ऑटो ई पोर्टलवर या संदर्भात कुणीही तक्रार करू शकणार आहे.

येथे विदेशातील संपत्ती, बेनामी संपत्ती, काळा पैसा, करचुकवेगिरी या संदर्भात विविध पर्यायातून तक्रार नोंदविण्यासाठी १२ जानेवारीला सीबीसीडीने http:/www.incometaxindiaefiling.gov.in ही लिंक अॅक्टीव्ह केली आहे. येथे तक्रार नोंदविताना तक्रारदाराचे नाव गुप्त राहीलच पण त्याला आधार कार्ड, पॅन नंबरची माहिती देण्याची जरुरी नाही. फक्त मोबाईल नंबर द्यावा लागेल कारण तक्रार दाखल करताना आयकर विभागाकडून एक ओटीपी मिळणार असून त्या माध्यमातून तक्रार दाखल होणार आहे. तक्रार दाखल झाली की एक युनिक नंबर तक्रारदाराला दिला जाईल. त्यावरून तक्रारदार त्याच्या तक्रारीची प्रगती किती झाली हे समजून घेऊ शकणार आहे.

काळा पैसा, कर चुकवेगिरी संदर्भातील तक्रारीसाठी १ कोटी रुपये इनाम दिले जाणार आहे तर विदेशी काळा पैसा, अन्य कर चोरी यासाठी काही अटींवर ५ कोटींचे इनाम दिले जाणार आहे.