मकरसंक्रांतीला म्हणून उडविले जातात पतंग

मकरसंक्रात पर्वात दान आणि पुण्य यांचे महत्व आहे. मात्र मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा प्राचीन काळापासून पाळली जाते. आबालवृद्ध पतंग उडविण्यासाठी या पर्वाची आतुरतेने वाट पाहात असतात. आजकाल अनेक ठिकाणी पतंगोत्सव साजरे होतात आणि देश विदेशातील पतंगबाज त्यात सामील होतात. संक्रांतिदिवशी सकाळ पासूनचा आकाशात रंगीबेरंगी पतंग गर्दी करू लागतात, अनेक ठिकाणी पतंग स्पर्धा होतात. या मागे जसे धार्मिक कारण आहे तसे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. मात्र त्याची माहिती अनेकांना नाही.

तांदनान या तमिळ रामायणानुसार भगवान रामाने पतंग उडविण्याची परंपरा सुरु केली. रामाचा पतंग थेत स्वर्गात गेला आणि इंद्राच्या सुनेला तो आवडला म्हणून तिने तो ठेऊन घेतला. तिला वाटले ज्याचा पतंग आहे तो न्यायला येईल. रामाने हनुमानाला स्वर्गात पाठविले. तेव्हा हनुमानाने पतंग रामाचा असल्याचे सांगितले तेव्हा तिने राम दर्शनाची इच्छा व्यक्त केली. हनुमान तिचा निरोप घेऊन रामाला भेटला तेव्हा रामाने चित्रकुट येथे दर्शन होईल असा निरोप तिला दिला. तेव्हा हनुमानाने परत स्वर्गात जाऊन पतंग आणला अशी ही कथा.

या प्रथेमागचे वैज्ञानिक कारण असे, की पतंग उडविण्यामुळे हाता पायाचा व्यायाम होतो. संक्रांत पर्वात हवा गार असते त्यामुळे हाता पायाच्या व्यायामाने शरीरात उर्जा निर्माण होते. सूर्यप्रकाशात राहिल्याने ड जीवनसत्व मिळते ज्याचा उपयोग हाडे बळकट होण्यासाठी होतो. तसेच उन्हामुळे सर्दी, खोकला पासून बचाव होतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते.