नबाब मलिक यांचे जावई समीर खान याना अटक

फोटो साभार रिपब्लिकन

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक आणि कौशल्यविकास मंत्री नबाब मलिक यांचे जावई समीर खान याना अमली पदार्थ विभागाने बुधवारी अटक केली. समीर खान यांना अमली पदार्थ विरोधी विभागाने बुधवारी अमली पदार्थ खरेदी प्रकरणात चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. तेथे त्यांची चौकशी करून त्यांचे म्हणणे नोंदवून घेतल्यावर समीर याना अटक करण्यात आल्याचे समजते.

मुंबईत २०० किलो अमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणात या चौकश्या अमली पदार्थ विरोधी विभागाकडून केल्या जात असून अनेक ठिकाणी एनसीबीने छापे मारले आहेत. या प्रकरणात ड्रग पॅडलरला दिल्या गेलेल्या पैश्याच्या संदर्भातली सत्यता पडताळून पाहण्यासाठी समीर याना एनसीबीने चौकशी साठी बोलावले होते. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीच्या कॅबिनेट मंत्र्यांचे जावई अमली पदार्थ प्रकरणात चौकशीच्या घेऱ्यात सापडल्याची माहिती दिली होती. सोमैयांनी दुसरे ट्वीट करून नबाब मलिक उत्तर द्या अशी मागणी केली आहे.