या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली


नवी दिल्ली – जगभरात २०२१ मध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली असल्याचा अहवाल नुकताच जाहिर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व शक्तिशाली पासपोर्ट असणाऱ्या देशांची नावे आहेत. हेनले ॲन्ड पार्टनर्सने नुकतेच सादर केलेल्या अहवालानुसार जपानचा पासपोर्ट जगभरात सर्वात जास्त शक्तिशाली असल्याचे समोर आले आहे. सर्वात शक्तिशाली देशाचा उल्लेख केल्यानंतर पहिल्यांदा आपल्या समोर अमेरिकेचे नाव येते. पण या यादीत अमेरिका सातव्या क्रमांकावर आहेत. तर पासपोर्टच्या यादीत ८५व्या स्थानावर भारत आहे. तसेच या यादीत खालून चौथ्या स्थानावर पाकिस्तान आहे. ७०व्या स्थानावर चीन आहे.

परदेशात जाणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असली तरी आपल्याला कोणत्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे हे जाणून घेणे देखील फार महत्वाचे आहे. व्हिसा घेतल्याशिवाय पासपोर्टधारक किती देशात प्रवास करु शकतो यावर अवलंबून आहे. जपानने याबाबतीत पहिला क्रमांक पटकविला आहे. एक शक्तिशाली पासपोर्ट रँकिंग कोणत्याही देशासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण जगात व्हिसाशिवाय त्या देशातील किती नागरिक प्रवास करू शकतात यावरच निर्णय घेतला जातो. या सुविधेअंतर्गत, इतर देशांमध्ये शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशातील नागरिकांना आगमनाची सुविधा उपलब्ध असते हे रँकिंग आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघटनेच्या डेटावर आधारित आहे.

भारताचा पासपोर्ट हेनले पासपोर्ट निर्देशांकात ८५ व्या क्रमांकावर आहे. जभारतीय पासपोर्ट धारकांना गातील ५८ देश कोणत्याही पूर्व व्हिसाशिवाय प्रवेश करू देतात. भारतासह तजाकिस्तान या ठिकाणी आहे. भारताचे स्थान सन २०२० मध्ये ८४ होते. तरीही जगातील ५८ देशांमध्ये भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यात येत असे.