सत्य साईबाबांची भूमिका साकारणार भजनसम्राट अनुप जलोटा


सत्य साईबाबांवर आधारीत चित्रपटात भजनसम्राट अनुप जलोटा हे झळकणार आहेत. अनूप जलोटा हे सत्य साईबाबांची या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. अनूप जलोटा सत्य साईबाबांची भूमिका करायला मिळत असल्यामुळे खूप आनंदी आहे. सत्य साईबाबांसारखा गेटअप करून त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अनूप जलोटा हे त्या फोटोत हुबेहुब सत्य साईबाबांसारखे दिसत आहेत.


विक्की रनौत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले होते आणि आता अनूप जलोटाच्या या लूकची खूप चर्चा होत आहे. सत्य साईबाबांसारखा गेटअप करून काही फोटो अनूप जलोटा यांनी सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, मला खूप आनंद आहे मी सत्य साईबाबा यांची भूमिका साकारणार आहे. कारण मी त्यांचे सिध्दांत आणि आदर्श मानतो. मी त्यांच्याबद्दल अभ्यास केला आहे. जॅकी श्रॉफ, गोविंद नामदेव, अरुण बक्षी आणि साधिका रंधावा हे अभिनेतेही या चित्रपटात दिसणार आहेत.