टेस्लाचा मुकाबला करणार स्वदेशी प्रवेग एक्स्टिंशन एम के १

फोटो साभार कारटोग

टेस्लाने भारतात प्रवेश केला असला तरी त्या अगोदरच देशी कंपनी प्रवेगने( pravaig) त्यांची खास लग्झरी इलेक्ट्रिक कार एक्स्टिंशन एम के १ सादर केली आहे. खास फिचर्स असलेली ही इलेक्ट्रिक कार फुल चार्ज मध्ये ५०० किमी अंतर कापेल असा कंपनीचा दावा आहे.

बंगलोर येथील प्रवेग डायनामिक्सच्या या कारने जागतिक ऑटो उत्पादकांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळविले आहे. ही कार टेस्लाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे ही अलिशान कार पूर्णपणे देशी बनावटीची आहे. दरवर्षी २५०० कार बनविण्याचे उदिष्ट कंपनीने ठेवले आहे. ही कार ८० टक्के चार्ज होण्यासाठी फक्त ३० मिनिटे घेते. तिला ९६ केएचडब्ल्यू बॅटरी दिली गेली आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ५.४ सेकंदात घेते. कंपनीने ही कार लीज बेसिसवर व्यावसायिक ताफ्यासाठी देण्याची तयारी दाखविली आहे.

या कारचे इंटिरियर अतिशय उत्तम प्रकारचे आहे. १० एक्स, कार्बन डाय ऑक्साईड रिडक्शन व एक शक्तिशाली पीएम २.५ फिल्टर दिला गेला असून त्यामुळे कार मधील हवेची गुणवत्ता हिमालयातील हवेप्रमाणे शुध्द राहणार आहे. १५ इंची लॅपटॉपसाठी एक डेस्क, पॉवर पोर्ट्स, दोन युएसबी थंडरबोल्ट पोर्ट्स दिली गेली असून कारची बांधणी एखाद्या टँक सारखी मजबूत आहे. कंपनीच्या इन्स्टाग्राम अकौंटवर ही माहिती दिली गेली आहे.