एलन मस्कच्या गर्ल फ्रेंड ला करोना

फोटो साभार कॅच न्यूज

टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ आणि जगातील दोन नंबरचे श्रीमंत एलन मस्क यांच्या गर्ल फ्रेंडला म्हणजे ग्रीम्स हिला करोना बाधा झाली आहे. ग्रीम्स कॅनेडीयन संगीतकार आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकौंटवर तिचा करोना रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याचे लिहिले आहे. ती म्हणते, मला करोना झाला आहे. करोनामुळे ताप येतोय पण मी त्याचाही आनंद घेते आहे.’

न्युयॉर्क पोस्टने या संदर्भात बातमी देताना ग्रीम्सने एलन किंवा त्यांच्या मुलाच्या करोना रिपोर्ट बद्दल काहीच माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यात तिचा अल्बम रेव एडीशन लाँच झाला होता. मात्र त्यापूर्वी एलन मस्क यांनी त्यांना करोना झाल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांच्या दुसऱ्या करोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. यावर मस्क यांनी लिहिले होते की करोना टेस्ट ही बोगसगिरी आहे. त्यांच्या एका दिवसात चार वेळा टेस्ट केल्या गेल्या. त्यातील दोन पोझिटिव्ह आणि दोन निगेटिव्ह आल्या. मशीन तेच, टेस्ट तीच, टेस्ट घेणारी नर्स सुद्धा तीच तरी हा प्रकार घडला म्हणजे बाकीच्यांच्या बाबतीत सुद्धा असेच घडत असेल अशी टिपण्णी मस्क यांनी केली होती.