निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर टीका


रत्नागिरी : माजी खासदार निलेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. शिवसेनेचे अनेक नेते नारायण राणे मंत्री असताना उद्धव ठाकरे यांची कामे घेवून भेटायला यायचे. बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात सुद्धा नारायण राणेंना फोन केल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणेंनी केला आहे.

मिलिंद नार्वेकरांपासून एकनाथ शिंदेपर्यंत सर्व शिवसेनेचे नते भेटायला यायचे, याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. जे आता मंत्री आहेत, राणे साहेबांकडे ते उद्धव ठाकरेंची किती कामे घेवून यायचे, त्याची माहिती आमच्याकडे सुद्धा आहेत. बंद खोलीत कुणाला फोन करायची गरज नसल्यामुळे विनायक राऊतांनी उड्या मारु नयेत. आम्ही स्वयंभू असल्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारची गरज नसल्याचा घणाघात निलेश राणेंनी केला.


विनायक राऊत यांना चागले ते दिसत नाही. मेडिकल कॉलेजची परवानगी मिळते. मेडिकल काऊंसील ऑफ इंडियाकडून परवानगी येते. आम्ही मेडिकल कॉलेलच्या जमीनसाठी प्रायव्हेट कर्ज घेतले असून त्यावर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेज परवानगीसाठी राज्य सरकारची गरज नसल्यामुळे शिवसेनेचा पोटात का दुखत असल्याची बोचरी टीका निलेश राणेंनी केली.


ही जमीन सरकारची प्रायव्हेट असल्यामुळे विनायक राऊतांना कोकणात राणेंवर भुंकायला पाठवले आहे. विनायक राऊत मातोश्रींवरचा टॉमी लोकांची सेवा करणे ही त्यांची ड्युटी आणि त्या बक्षिसासाठी विनायक राऊत बोलतात. ग्रामपंचायतीची निवडणूक आणि आरोप राणेंवर त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत पातळीवर काही बोलले नसल्याचेही ते म्हणाले.

दिपक केसरकर यांच्याकडे 2014 ते 2019 या कालावधीत गृहराज्यमंत्री पद होते. त्यावेळी का नाही केल्या केसेस ओपन. त्यामुळे राणेंच्या बदनामीचा अजेंडा आहे. विनायक राऊत यांचा मुलगा वाया गेल्यामुळे दुसऱ्यांचा वाईट आणि आपला तो चांगला होत नाही ना. मग, दुसऱ्यांवर टीका करा, हेच विनायक राऊतांचे ध्येय असल्याचे म्हणत त्यांनी विनायक राऊतांवर टीका केली.