पैसे घेऊन आंदोलन करत आहेत शेतकरी; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमेवर मागील दीड महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी केंद्र सरकारला फटकारले आहे. त्यातच आता शेतकरी आंदोलनाबाबत एका भाजप खासदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हे आंदोलन फसवे असून पैसे घेऊन शेतकरी आंदोलन करत असल्याचा दावा भाजप खासदाराकडून करण्यात आला आहे.

कर्नाटकामधील कोलार येथील भाजप खासदार मुनीस्वामी यांनी म्हटले कि, दिल्लीतील आंदोलनात बहुतांश दलाल किंवा तोतये शेतकरी आहेत. शेतकरी या आंदोलनादरम्यान पिझ्झा, बर्गर आणि केएफसीमधून ऑर्डर करून जेवत आहेत. एक जीमही आंदोलन सुरू असलेल्या भागात सुरू करण्यात आले असून हे नाटक आता बंद झाले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.