आयफोन १३ असेल सर्वात स्लीम आयफोन 

फोटो साभार गिझ चायना

आयफोन १२ बाजारात सादर होऊन सहाच महिने झाले असताना अॅपल आयफोन १३ ची चर्चा सुरु झाली आहे. टेक साईट मॅट ओत्कारा नुसार आयफोन १३ चे डिझाईन आत्ता पर्यंत आलेल्या सर्व आयफोन मध्ये सर्वात चांगले असेल कारण अॅपलने या फोनच्या डिझाईनवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

आयफोन १३ आत्तापर्यंतच्या सर्व आयफोन मधील सर्वात स्लीम फोन असेल आणि त्याला जास्त क्षमतेची बॅटरी दिली जाईल. या फोन मध्ये फ्रंट स्पीकर काढला जाईल. आयफोन मध्ये आत्तापर्यंत सर्व हँडसेट मध्ये फ्रंट स्पीकर आहे. या फोनच्या रिअर कॅमेऱ्यात बदल केला जाईल.

विश्लेषक मिंग ची कोच्या म्हणण्यानुसार आयफोन १३ मध्ये कॅमेरा लेन्स बदलले जातील. त्यासाठी सनी ऑप्टिकल, लार्गन व जिनियस इलेक्ट्रोनिक्स ऑप्टिकल बरोबर चर्चा सुरु आहे. या फोनसाठी सॉफ्ट बॅटरी टेक्नोलोजीचा वापर केला जाईल यामुळे फोनची किंमत कमी होईल आणि फोन मध्ये जागा वाचेल. हा फोन सुद्धा चार मॉडेल मध्ये येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.