अनुष्का- विराटच्या कन्येचे नाव ठरविणार हे बाबा

फोटो साभार नई दुनिया

टीम इंडिया कप्तान विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा याना ११ जानेवारीला कन्यारत्न प्राप्ती झाल्याचे वृत्त झळकल्यावर या नवजात बाळाचे नाव काय असेल याचे तर्क लढविले जाऊ लागले आहेत. मात्र या दोघाच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या बाळाचे नाव अनुष्काचे गुरु, महाराज अनंत बाबा ठरवतील. अनुष्काची महाराज अनंत बाबा यांच्यावर मनापासून श्रद्धा असून ते तिच्या आईचेही गुरु आहेत. लग्न, घर खरेदी, नवीन चित्रपटाची सुरवात अश्या अनेक बाबतीत अनुष्का या गुरूंचा सल्ला घेते.

हरिद्वार येथे या अनंत बाबांचा आश्रम असून त्याचे नाव अनंतधाम आहे. अनुष्का विराटच्या लग्नाचे विधी याच बाबांनी केले होते. त्यांचे मूळ नाव प्रदीप अग्निहोत्री असून वयाच्या १५ व्या वर्षीच अध्यात्मिक मार्ग स्वीकारून ते वेद संपन्न, उपनिषद, कुंडलिनी योग आणि ज्योतिष शास्त्रात पारंगत झाले होते.

अनुष्का प्रमाणेच विराटचीही या बाबांवर श्रद्धा आहे. अनुष्का सांगते जेव्हा मनाला शांतता हवी असते तेव्हा तेव्हा ती अनंत बाबांच्या आश्रमात मुक्काम करते. २०१५ मध्ये विश्वकप सामन्यात विजय मिळावा आणि विराटचा खेळ उत्तम व्हावा अशी कामना धरून अनुश्काने येथे विशेष रुद्राभिषेक केला होता.