विनायक राऊत यांचा दावा नारायण राणेंनी लावला फेटाळून


सिंधुदुर्ग – काही दिवसांपूर्वी नारायण राणे सातत्याने मातोश्रीवर फोन करत असल्याचा शिवसेना नेते विनायक राऊत यांचा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलताना फेटाळून लावला आहे. मातोश्रीवर मी कधीही फोन केला नाही. माझ्या हिंमतीवर मी वैद्यकीय महाविद्यालय उभारल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

माझ्यावर आकसापोटी विनायक राऊत टीका करतात. मुळात राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून वैद्यकीय महाविद्यालयासाठी परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली आहे. दरम्यान, विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत असल्याचे म्हटले होते.