हिंदू महासभेने ग्वाल्हेरमध्ये सुरू केली नथुराम गोडसेंच्या नावाने ज्ञानशाळा


भोपाळ – हिंदू महासभेकडून मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे नथुराम गोडसे यांच्या नावाने ज्ञानशाळा सुरू करण्यात आली आहे. नथुराम गोडसेंचे विचार याद्वारे युवकांपर्यंत पोहचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, ही शाळा सुरू रविवार(१० जानेवारी) करण्यात आली तेव्हा नथुराम गोडसेचा जयजयकार देखील हिंदू महासभेकडून करण्यात आला.

नथुराम गोडसेबरोबर अनेक महापुरूषांचे फोटो देखील या कार्यक्रमाप्रसंगी ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आता एक नवा वाद उफळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोडेसे कार्यशाळा ग्वाल्हेरच्या दौलतगंज येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. गोडसे ज्ञानशाळेचे उद्घाटन झाले असून आमच्या सोबत तरुणांसह अनेक महिला देखील आहेत. गोडसे यांनी गुरु गोविंद सिंग, डॉ. हेडगेवार, वीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सारख्या महापुरुषांपासून प्रेरणा घेतली होती. आमचे केवळ असे म्हणे आहे की कुणीही या देशाचे विभाजन केले, तर त्याला हिंदू महासभा प्रखरपणे उत्तर देईल. पुन्हा एकदा नथुराम गोडसे हिंदू महासभेकडून निर्माण करण्यात येईल, असे माध्यमांशी बोलताना हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी सांगितले आहे. युवा पिढीला भारताच्या फाळणीच्या पैलूंविषयी आणि विविध राष्ट्रीय नेत्यांविषयी ज्ञान प्रसारित करण्यासाठी हे अभ्यास केंद्र माहिती देईल, असे देखील हिंदू महासभेकडून सांगण्यात आले आहे.