व्हॉटस अप ला मागे टाकून सिग्नल सुसाट

व्हॉटस अप ने काही दिवसांपूर्वी युजर्ससाठी नवे धोरण जाहीर केल्यानंतर व्हॉटस अप सोडून देण्याकडे युजर्सचा कल वाढला आहे. याचा परिणाम मेसिजिंग अॅप सिग्नल चे डाऊनलोडिंग प्रचंड वेगाने केले जात असल्याचे दिसून आले आहे. सिग्नल भारतात टॉप फ्री अॅप बनले आहेच पण जर्मनी, फ्रांस, ऑस्ट्रिया, फिनलंड, हॉंगकॉंग, स्वित्झर्लंड या देशात सुद्धा सिग्नलने व्हॉटस अप ला पछाडून टॉप फ्री अॅप बनण्याचा विक्रम केला आहे.

गेल्या दोन दिवसात अँड्राईड व आयओएस वरून १ लाखाहून अधिक संखेने सिग्नल डाऊनलोड केले गेले आहे तर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात व्हॉटस अप इन्स्टॉलेशन मध्ये ११ टक्के घट झाली आहे. काही वेळा सिग्नल डाऊनलोडिंग साठी इतकी गर्दी होते की ओटीपी व्हेरीफाय करायला वेळ लागतो असे  रॉयटरने म्हटले आहे.

सिग्नल युजर्स मेसेज, ऑडीओ व्हिडीओ कॉल, फोटो, व्हिडीओ, लिंक शेअर अश्या अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात. विशेष म्हणजे यात युजर्स डेटा फार अल्प प्रमाणात वापरला जातो शिवाय इनक्रिपटेड डाटा बेस युजरच्याच फोन मध्ये सुरक्षित राहतो. डिसेंबर २०२० पासून सिग्नलने ग्रुप व्हिडीओ ऑप्शन सुद्धा उपलब्ध करून दिले आहे. असेही म्हणतात जगातील सर्वधिक श्रीमंत बनलेल्या एलन मस्क याचा मोठा हातभार सिंग्नलची लोकप्रियता वाढविण्यास लागला आहे. त्यांनी ट्विटर वरून ट्विट करून सिग्नल वापरत असल्याचे जाहीर केल्यावर सिग्नल डाऊन लोड करण्याचा वेग वाढला असे सांगितले जात आहे.