फडणवीस, राज ठाकरे याची सुरक्षा घटविली

फोटो साभार ओरिसा पोस्ट

उद्धव ठाकरे सरकारने रविवारी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार याची सुरक्षा काढून घेतली गेली आहे. सरकारचा हा निर्णय बदल्याच्या भावनेतून घेतला गेल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची सुरक्षा झेड प्लसवरून वाय प्लस करण्यात आली असून त्यांच्या वाहन ताफ्यातून बुलेटप्रूफ गाड्या काढून घेतल्या गेल्या आहेत. अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाय प्लस वरून एक्स वर आणली गेली आहे. मात्र सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सुरक्षा वाढवून ती वायवरून झेड प्लस केली गेली आहे. तसेच शत्रुघ्न सिन्हा यांची सुरक्षा वाढवून ती वायवरून वाय प्लस केली गेल्याचे समजते.