करटोलीच्या सेवनाने शरीर बनवा लोखंडासारखे मजबूत


पावसाळ्याच्या दिवसात बाजारात अनेक नवीन भाज्या दिसू लागतात. यातील काही वर्षातून एकदाच म्हणजे पावसाळ्यातच मिळतात. त्यातील एक म्हणजे करटोली. हिरवी मध्यम आकाराची बाहेरून बारीक कात्यासारखे उंचवटे असलेली ही भाजी विशेष महत्वाची आहे कारण तिच्या सेवनाने शरीर लोखंडसारखे कणखर बनते. अनेक पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त अश्या या भाजीला गोड कारली, काकोडी, कंदोल या नावानेही ओळखले जाते. जगातील हि सर्वाधिक औषधी भाजी मानली जाते.


ही भाजी स्वादिष्ट आहेच पण यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. या भाजीतील प्रोटीनपासून मिळणारी ताकद मासापेक्षा ५ पट अधिक आहे. यातील फायटो केमिकल्स आरोग्य प्रदान करतात. अँटीऑक्सिडन्ट, तंतूंचे भरपूर प्रमाण यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे, वजन घटविणे, पोट साफ ठेवणे, पचनक्रिया सुधारणे यासाठी ती उपयुक्त आहेच पण त्यातील ल्युटेन सारखे कॅरोनाइड्स डोळ्याचे रोग, हृदय रोग तसेच कॅन्सरला प्रतिबंध करतात. अँटीअॅलर्जिक गुणामुळे सर्दी, खोकला यावर ती गुणकारी आहे. या १०० ग्राम भाजीत फक्त १७ कॅलरी असतात त्यामुळे तिचे सेवन वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

Leave a Comment