दोन लाखापेक्षा जास्तीचे सोने खरेदीसाठी केवायसी अनिवार्य


मुंबई : सोन्या-चांदीच्या खरेदीबाबतच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने आता मोठे बदल केले आहेत. आता एका निश्चित रकमेपर्यंत दागिने खरेदी केल्यास त्यावरील केवायसीची अनिवार्यता सरकारने रद्द केल्यामुळे तुम्ही आता निश्चिंत होऊन सोने खरेदी करु शकता.

अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनुसार, सोन्याच्या दागिण्यांच्या खरेदीचे मूल्य ज्या प्रकरणांमध्ये जास्त असेल, त्याच ग्राहकांना फक्त पॅन किंवा आधार कार्डसोबत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. 28 डिसेंबर, 2020 ला अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या एका अधिसूचनेवर स्पष्टीकरण दिले आहे.

त्यानुसार दोन लाख रुपयांपेक्षा जास्तीचे दागिने, सोना-चांदी किंवा रत्न आणि मौल्यवान रत्न खरेदी करण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. गेल्या काही वर्षांपासून हे नियम लागू करण्यात आले आहे. अधिसूचनेनुसार, ग्राहकांना 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या मूल्याचे रत्न किंवा दागिने खरेदी करताना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

प्रत्येकवेळी सोने-चांदी किंवा इतर मुल्यवान दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांची ओळख सांगणे म्हणजेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे नाही. केवायसी बँकेत आणि आर्थिक संस्थांमध्ये अत्यंत महत्त्वाची असते. कारण, या प्रक्रियेमुळे ग्राहकाची ओळख सुनिश्चित होते. त्यानंतर फसवणूक होण्याचा धोका कमी होतो.