नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी जर तुम्ही दरमहा अधिक खर्च करत असाल तर आपल्यासाठी आता बाजारात एक नवीन डेबिट कार्ड बाजारात आणले गेले असून तुमच्या पैशांची बचत करण्यास जे उपयुक्त ठरेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) संयुक्तपणे को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड सुरू करण्याची घोषणा केली आहे.
SBI आणि IOCL ने केली को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्डची घोषणा
संपूर्ण देशात हे कार्ड सुरू करण्यात आले आहे. इंडियन ऑईल स्टेशनवर याद्वारे 200 रुपये खर्च केल्यानंतर ग्राहकांना 6 पट रिवॉर्ड पॉइंट्स आणि 0.75 टक्के लॉयल्टी पॉइंट्स मिळतील. त्याचबरोबर, ग्राहक रेस्टॉरंट, चित्रपट, किराणा आणि युटिलिटी बिलांच्या किंमतीवर रिवॉर्ड पॉइंट्स कमवू शकतात आणि ते रीडीम करु शकतात. यावर इंधन खरेदी करण्यासाठी महिन्याची मर्यादा नाही. भारतात कोठेही हे डेबिट कार्ड वापरले जाऊ शकते. एसबीआयच्या मुख्य शाखेत जाऊन याकार्डसाठी अर्ज करू शकता.
नुकतेच आरबीआयद्वारे ‘टॅप अँड गो’ फीचरनुसार 5000 रुपयांपर्यंत देय देण्यास मान्यता दिल्यानंतर कॉन्टॅक्टलेल पेमेंट्स वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर, एसबीआय-आयओसीएल कॉन्टॅक्टलेस रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून ‘टॅप अँड गो’ फीटरद्वारे पाच हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट देखील केले जाऊ शकते. या को-ब्रांडेड कार्डमध्ये ‘टॅप अँड पे’ टेक्निकसह अनेक आकर्षक ऑफर्स मिळतील. कार्डधारकांना केवळ इंधन खरेदीचा एक फायद्याचा अनुभव मिळणार नाही, तर हे सुरक्षितपणे ग्राहकांच्या रोजच्या खरेदीला सुलभ बनवेल, असे एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी सांगितले.