डोनल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची शंका

राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याची शंका घेतली जात असून त्यांच्या सहकाऱ्यांनीच ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह लावले असल्याचे सांगितले जात आहे. डेली मेल मधील रिपोर्टनुसार निवडणूक हरल्यापासून ट्रम्प स्वतःची विधाने सतत बदलत आहेत. ट्रम्प यांच्या कॅबिनेट मधील सदस्य व रिपब्लिकन नेते यावर चर्चा करत असून गेले काही दिवस ट्रम्प ज्या पद्धतीने वर्तणूक करत आहेत ते पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा दावा फेटाळणे अशक्य असल्याचे सांगत आहेत.

अन्य एका मिडिया रिपोर्ट नुसार ट्रम्प यांचे स्टाफ मेम्बर्ससुद्धा या बाबत चर्चा करत आहेत. ट्रम्प अनेकदा एकटेच मोठमोठ्याने बोलतात, एकाएकी ओरडतात असेही सांगितले जात आहे. ट्रम्प यांच्या कुटुंबियांनी त्यांना निवडणूक पराभव मान्य करण्याचा सल्ला दिल्यापासून ते कुटुंबावर सुद्धा नाराज आहेत. त्यांचे मानसिक संतुलन खरोखरच ठीक नसेल तर कॅपिटल हिंसा प्रकरणात ते आणखी बिघडू शकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सीएनएनच्या बातमीनुसार कॅपिटल हिंसा प्रकरणानंतर ट्रम्प यांच्या कॅबिनेट सदस्यांनी एक गुप्त बैठक घेतली आहे. त्यात संविधानाच्या २५ व्या कलम दुरुस्तीचा वापर करून ट्रम्प यांना पदावरून हटवावे का याबाबत चर्चा झाल्याचे म्हटले आहे. उपराष्ट्रपती पेन्स यांनी कॅपिटल हिंसा हा काळा दिवस असल्याचे वक्तव्य केल्याने ट्रम्प त्यांच्यावर रागावले असून त्यांनी पेन्स यांचे चीफ ऑफ स्टाफची व्हाईट हाउस मधून हकालपट्टी केली आहे असेही समजते.